11th Admission 2026 pudhari photo
सातारा

11th Admission: इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

28 मे पर्यंत नवीन विद्यार्थी नोंदणी, 26 रोजी गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार

पुढारी वृत्तसेवा

कराड : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 संदर्भातील कॅप फेरी आणि कोटा प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग-1 भरण्याची प्रक्रिया 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असून 28 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी व गुण निश्चितीची प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत केली जाणार आहे.

नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी व अर्ज भरणे कालावधी : 21 मे ते 28 मे वेळ : 21 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून, 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी भाग-1 भरून कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध : दि.23 मे विद्यार्थ्यांना अर्जातील गुण व प्रवर्ग तपासण्याची संधी मिळणार. हरकती व दुरुस्ती कालावधी : दि. 23 मे ते 24 मे विद्यार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करता येणार. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : दि. 26 मे अंतिम गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची संधी दिली जाणार.

पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरणे : दि. 26 मे ते 28 मे. विद्यार्थ्यांनी पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करायची आहे. प्रवेश निश्चिती कालावधी : 29 मे ते 31 मे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहणार आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्चित होईल. कोटा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोटा प्रवेश अर्ज प्रक्रिया कालावधी : 21 मे ते 28 मे. व्यवस्थापन, अल्पसंख्याक व अंतर्गत कोट्यासाठी अर्ज करता येणार. गुणवत्ता यादी जाहीर : दि. 26 मे. कोटा प्रवेश निश्चिती कालावधी : 29 मे ते 31 मे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT