Chiplun Karad Road closure Pudhari
सातारा

Chiplun Karad Road closure: चिपळूण-कराड मार्ग 60 दिवस राहणार बंद

हलक्या वाहनांना पर्यायी रस्ता; अवजड वाहतूक आंबा घाटाने

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड ते चिपळूण हा राष्ट्रीय महामार्ग दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पाटण येथील धांडे पुलाच्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण हाती घेणार असल्याने तब्बल 60 दिवस चिपळूण-कराड मार्ग बंद राहणार आहे. याबाबत 27 मार्च रोजी 12 वाजल्यापासून 27 मे रात्री 12 वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

यासंदर्भात साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी अधिसूचना जारी केली आहे. पाटण शहरातील रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे चिपळूण-कराड मार्ग 60 दिवस बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी वाहतुकीचे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. कराड-उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी वाहतूक कराड-उंब्रज येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 मार्गे पाचवड, उंडाळे, कोकरूड, मलकापूर, संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT