Child death  File Photo
सातारा

Child Death: घराचे लोखंडी प्रवेशव्दार अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

घराचे लोखंडी प्रवेशव्दार अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी अंत झाला

पुढारी वृत्तसेवा

कराड : घराचे लोखंडी प्रवेशव्दार अंगावर पडल्याने दोन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी अंत झाला. मलकापूर येथील रिमांड होम मागील कॉलनीत सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकार घडला. विघ्नेश वल्लभ मुळे (वय दोन वर्षे चार महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुड्याचे नाव आहे. त्याच्या दुर्देवी मृत्यूबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरण अत्यंसंस्कार करण्यात आले.

येथील भोई गल्लीतील वल्लभ शामराव मुळे मलकापूरातील रिमांड होम परिसरात राहतात. काल होळीनिमित्त ते त्यांच्या पत्नी व मुलासोबत होळी पूजनास भोई गल्लीत आले होते. होळी पुजनानंतर ते रिमांड होम परिसरात घरी गेले. त्यावेळी मुलगा विघ्नेश त्यांच्या दुचाकीवरून उतरून घरात निघाला होता. त्याचवेळी त्यांचे लोंखडी प्रवेशव्दार कोसळले. विघ्नेश त्याखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला.

वल्लभ यांनी त्यांची दुचाकी तेथेच टाकून त्याला वाचविण्यासाठी धोवले. वल्लभ, त्यांच्या पत्नी तेथील अन्य लोकांच्या मदतीने विघ्नेशला कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले. विघ्नेशचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT