चाफळमधील श्रीराम मंदिर file photo
सातारा

चाफळमधील श्रीराम मंदिर : पर्यटनाचे ऊर्जा केंद्र

Chaphal Shriram Temple: सुट्टीतील आनंद लुटण्यासाठी दैनंदिन हजारो पर्यटक घेत आहेत निसर्गाचा आस्वाद

पुढारी वृत्तसेवा
राजकुमार साळुंखे

चाफळ : निसर्ग समृद्धीतेने नटलला पाटण तालुका. त्यात चाफळ श्रीराम मंदिरात व विभागातील विविध धार्मिक स्थळे म्हणजे निसर्ग पंढरी. सध्या याच पंढरी मध्ये मे महिन्यातील सुट्टीतील आनंद लुटण्यासाठी आपल्या कुटुंबासह दैनंदिन हजारो पर्यटक या निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. धकाधकीच्या व तणावग्रस्त प्रदुषणाच्या जगातून बाहेर येऊन काही काळ का होईना पण याच ठिकाणी मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न हा निश्चितच संबंधितांना सार्वत्रिक ऊर्जा देणारा ठरत आहे.

आता मानवाला निसर्गाचे व स्वतः च्या जीवनशैलीचे महत्व पटल्याने अशा पर्यटन केंद्रांना महत्व प्राप्त झाले आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिर ,अकरा मारुती पैकी चार मारुती मंदिरे, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट ठिकाण, उत्तरमांड धरण ,धरणात सुरू असलेले बोटींग रामघळ पवनचक्या प्रसिद्ध माऊली आई मंदिर ही सध्या चाफळ परिसरातील पर्यटनाची ऊर्जा केंद्र बनली आहेत. त्यामुळे आता चला ही चाफळ नगरी बघायलाच नव्हे तर जगायलाही या असे आमंत्रणच इथला निसर्गराजा सर्वांना देत असल्याची अनुभूती येथे यायला लागली आहे.

नानाविधी निसर्ग संपत्ती लाभलेला चाफळ परिसरात निसर्गाने भरभरून दान पदरात टाकले आहे. त्याच साधनसंपत्तीच्या जोरावर आता हाच चाफळ परिसर पुन्हा नव्याने पर्यटन विकासाची कात टाकताना  पहायला मिळत आहे. पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः निसर्गाची मुक्तहस्ते उधळण करताना पहायला मिळतो त्यामुळे हाच निसर्ग आता जिल्हा,राज्य,परराज्यच नव्हे तर प्रदेशातील पर्यटकांचेही आकर्षन बनू लागला आहे.

डोंगरदऱ्यांत विखुरलेला आणि हिरवागार शालू परिधान केलेल्या सध्याच्या नैसर्गिक कामयेचे वास्तव स्वतः च्या डोळ्यातूनच अनुभवायला पाहिजे.चाफळ येथील श्रीराम मंदिर, अकरा मारुती पैकी चार मारुती मंदिरे, उत्तरमांड धरण, धरणातील जलाशयातील बोटींग, माऊली आई मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रथम भेटीच ठिकाण,,खडीचा मारुती मंदिर परिसर, उत्तरमांड धरण परिसरातील निसर्ग सौंदर्य  हे चाफळ येथील पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. तणावग्रस्तातून बाहेर येण्यासाठी  कुटुंबासह एक दिवस चाफळ परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हाऊसफुल्ल असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

त्यामुळे सर्व सोयींनी युक्त असा हा निसर्ग सर्वांनीच अनुभवायला हवा शहरातील प्रदुषण कामाचा दैनंदिन ताण,तणाव घालवण्यासाठी आणि किमान मोकळा श्वास घेऊन पुन्हा नव्या ऊजेंसह काम करण्यासाठी आता चाफळ, बघायला या आणि जगायलाही या असेच आमचे निमंत्रण सध्या हा निसर्ग देतोय हे नक्कीच. पर्यटकांमध्येही वाढ होत आहे. ही नक्कीच चांगली बाब आहे. सध्या मे महिन्यातील सुट्टीतील आनंद लुटण्यासाठी विविध राज्यातून अनेक पर्यटक चाफळ येथील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.चाफळ येथील भक्त निवासात राहण्याची व परिसरात जेवणाची देखील उत्तम सोय पर्यटकाच्यासाठीअसल्याचे अनेक पर्यटक चाफळ. येते आल्याचे पहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT