Maharashtra Budget 2026  Pudhari
सातारा

Maharashtra budget 2026: सातारा जिल्ह्याला ‌‘छप्पर फाडके‌’

किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण व संवर्धन - 135 कोटी, संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचे जतन, संवर्धन - 133 कोटी

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुला करणारा अर्थसंकल्प सातारा जिल्ह्याला पावला आहे. दै. ‌‘पुढारी‌’ने शुक्रवारी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‌‘साताऱ्याचा दबदबा राहणार का?‌’ असा सवाल केला होता. एक उपमुख्यमंत्री व चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्याला अर्थसंकल्पाने ‌‘छप्पर फाडके‌’ निधी दिला आहे.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या रेट्याने सातारा जिल्ह्याच्या विकासाचे दार उघडले आहे. जिल्ह्याचा मंत्री समुह धावला आणि अर्थसंकल्प पावला असेच या घडामोडीचे वर्णन करावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT