प्रातिनिधिक छायाचित्र.  (File Photo)
सातारा

Satara brothel raid: कुंटणखान्यावर छापा; चार महिलांची सुटका

दोघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जावली तालुक्यातील सरताळे गावाच्या हद्दीतील राज इंडियन हॉटेल, लॉज येथे कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी छापा टाकला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉजमालक सचिन तुकाराम भिसे, कामगार सूरज नंदकुमार भिसे (दोघे रा. सरताळे) यांना ताब्यात घेतले आहे. रावेश शेट्टी (रा. उडपी, कर्नाटक) हा पसार झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर चालणार्‍या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. अरुण देवकर यांनी त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा साताराअंतर्गत असणार्‍या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

सरताळे गावचे हद्दीतील राज इंडीयन हॉटेल, लॉज चालक मालक यांनी वेश्यागमनासाठी मुली ठेवल्या आहेत. ते मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवतात. पीडित महिलांना वेश्यागमनासाठी उद्युक्त करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसायास प्रेरणा देणारा लॉजमालक सचिन तुकाराम भिसे याच्यासह सुरज नंदकुमार भिस, रावेश शेट्टी यांच्या विरुध्द मेढा पोलीस ठाण्यात मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 4 पीडित महिलांची सुटका केली.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सपोनि सुधीर पाटील, मेढा पोलीस ठाण्याच्या अश्विनी पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, शिवाजी गुरव, विक्रम पिसाळ, मोनाली निकम, क्रांती निकम, मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जनार्दन गायकवाड, रफिक शेख, नंदकुमार कचरे, विजय शिंदोलकर, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रवण राठोड, नितीन कदम यांनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT