विंगजवळ दुचाकी अपघातात मुलगा ठार File Photo
सातारा

विंगजवळ दुचाकी अपघातात मुलगा ठार

एकजण गंभीर जखमी; दोघेही दहावीचे विद्यार्थी

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) गावच्या हद्दीत कणसे मळा परिसरातील वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण आपघातात एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून ही घटना काल दुपारी घडली.

रिहान शहानवाज खान (वय (16, रा. टाकेवस्ती, चचेगाव) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर अभिनव दिनेश मोहिते (रा. आगाशिवनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहान अणि अभिनव दोघे मित्र कराडहून दुचाकीवरून विंगला यात्रेनिमित्त व अन्य खरेदीसाठी येत होते. कराड-ढेबेवाडी मार्गावर कणसे मळा येथील एका वळणावर दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात रेहानच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. मित्र अभिनव त्यात गंभीर जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातावेळी मोठा आवाज होऊन स्थानिकांसह व नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

दरम्यान, दोघेही विंगच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी आहेत. रिहान मुळचा करंजे (सातारा) येथील रहिवासी असून टाकेवस्ती चचेगाव येथे आजोळी मामाकडे शिक्षणासाठी राहत होता. कराडच्या वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर रिहानचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. जखमी अभिनव मुळचा पाटण तालुक्यातला उमरकांचन येथील रहिवासी असून तो सध्या आगाशिवनगर येथे राहत आहे. अपघाताची नोंद कराडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. कोळे दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरिक्षक एस. डी . भिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विठ्ठल खाडे व हावलदार एस. एस. गडाकुंश अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT