कराड : भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ संवाद मेळाव्यात बोलताना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, व्यासपीठावर खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, मंत्री भरत पाटील, आ.मनोज घोरपडे, आ.धैर्यशील कदम, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. निरंजन डावखरे व मान्यवर.  
सातारा

Ravindra Chavan : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील!

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास; कराडमधील मतदार संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

कराड : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित असून, पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले आहेत. त्यामुळे मतदार त्यांना भरघोस पाठिंबा देतील आणि दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी कराड येथील हॉटेल फर्नमध्ये मतदार संवाद बैठक झाली. आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

रविंद्र चव्हण म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजपचे उमेदवार महायुतीच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीत मतदार नोंदणीला विशेष महत्त्व असून, भाजपने नोंदणीसह प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले आहे. डॉ. स्मिता जाधव या पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे मतदारांनी दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीची मते द्यावीत.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, भाजपने केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकारण केलेले नाही, तर सर्वसामान्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले आहे. योग्य व्यक्तींना राजकारणात संधी देण्याचे काम पक्षाने केले आहे. दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून जनसेवेची संधी द्यावी. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च असते आणि ती भाजपच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री जयकुमार गोरे यांनी पुणे आणि दिल्लीतील आंदोलनांवर टीका केली. काही मागण्यांच्या माध्यमातून विरोधक राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ.स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासह ना. गोरे यांनी व्यक्त केला.

मेळाव्यास भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. आभार राजेंद्र यादव यांनी मानले. बैठकीला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र यादव यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT