सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सातारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले महिनाभर हे पद रिक्त होते. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मानणारे व काम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना संघटन कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते पाच वेळा आमदार आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहकार मंत्री होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील पक्षवाढ व पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने देशाचे नेते खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, खा.सुप्रियाताई सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. रोहित पवार यांनी जिल्ह्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर दिली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्यात मजबूत होईल, असा विश्वास त्यांच्या नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माजी मंत्री व नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, खा. सुप्रियाताई सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आ. रोहित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी अभिनंदन केले आहे.