कराड : पत्र देताना तहसीलदार कल्पना ढवळे व इतर. Pudhari Photo
सातारा

fake voters: 'त्या' बोगस मतदारांवर कारवाईचे आश्वासन

गणेश पवार यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत कापिल येथे नऊ लोकांनी आधार कार्ड वरती कापिल गावचा बनावट पत्ता बदलून कापील येथे मतदान नोंदणी केली होती. यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी गणेश पवार यांनी तहसील कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून आमरण उपोषण चालू होते. संबंधितांवर कारवाई केली जाईल,असे लेखी पत्र दिल्यानंतर पवार यांनी शुक्रवारी रात्री उपोषण तात्पुरते स्थगित केले. कारवाईचे लेखी पत्र तहसीलदार कल्पना ढवळे त्यांनी दिले.

यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि.राजू ताहसीलदार, एपीआय माळी, पीएसआय मगदूम, बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे आदी उपस्थित होते.संबंधितांवर कारवाई झाली नाही तर उपोषण आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT