सातारा : भारतीय सैन्य दलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघांना 3 लाख 70 हजारांचा गंडा घालणार्या एकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप विठ्ठल काळे (रा. कोळे, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत रितेश नितीन जाधव (वय 21, रा. नेले, ता. सातारा) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयिताने रितेश जाधव याला व त्याचा भाऊ आयुष जाधव याला भारतीय सैन्य दलात एएमसी युनिटमध्ये क्लार्क या पदावर जॉब लावतो, असे आमिष दाखवले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांची 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. हवालदार वायदंडे हे तपास करत आहेत.