सातारा

सातार्‍यात अ‍ॅपद्वारे फ्रॉड करणार्‍याला अटक

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात स्वेटर विक्रेत्यांकडून खरेदी केल्यानंतर पेटीएम कोडद्वारे पैसे पाठवल्याचे नाटक करून पैसे न देताच फसवणूक करणार्‍या ठगाला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने अटक केली. पोलिस संशयिताकडे असणार्‍या 'अ‍ॅप'ची माहिती घेत आहेत. दरम्यान, चौकशीमध्ये संशयिताने सातार्‍यातील सुमारे 4 व्यावसायिकांना फसवल्याचे समोर आले आहे.

तानाजी बाळकृष्ण जानकर (वय 24, मूळ रा. पळसावडे ता. सातारा सध्या रा. गडकर आळी, शाहूपुरी) असे अटक केलेल्या पान 2 वर
संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी सिरींग टाशिलामो (वय 52, सध्या रा. राधिका रोड, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 29 नोव्हेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार यांचा सातारा पंचायत समितीच्या पाठीमागे स्वेटर विक्रीचा व्यवसाय आहे. दि. 29 रोजी दुचाकीवरुन एक अनोळखी युवक तेथे आला. संबंधिताने तक्रारदार यांच्याकडून 2 हजार रुपये किंमतीची कपडे घेतली. पैसे देण्यासाठी संबंधित युवकाने पेटीएम कोडची मागणी केली असता दुकानदाराने तो कोड दिला. पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीने पैसे पाठवल्याचा 'सक्सेसफुल' मेसेज दाखवला. मात्र दुकानदाराने पाहिले असता पैसे जमा नसल्याचे सांगितले. संबंधित युवकाने हीच संधी साधत त्याने गडबड असल्याचे सांगून पैसे नंतर येतील अशी बतावणी केली. तसेच काही तक्रार असेल तर त्याने मोबाईल क्रमांक दिला व त्यावर संपर्क करण्यास सांगितले.

दुकानदाराने खात्री केल्यानंतरही पैसे आले नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित दिलेल्या फोनवर संपर्क केला असता तो चुकीचा क्रमांक असल्याचे समोर आले. यामुळे तक्रारदार यांनी घडलेल्या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. डीबी पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात करुन संशयिताचे वर्णन घेतले. डीबी पथकाने संशयित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडे असणार्‍या अ‍ॅपची माहिती पोलिस घेत आहेत.

पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विक्रम माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT