सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतशिवारात रब्बी पेरणीची धांदल सुरू आहे. जिल्ह्यात रब्बीचे 2 लाख 13 हजार 210 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत 1 लाख 37 हजार 283 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी पेरणी 64 टक्के क्षेत्रावर झाली असून ज्वारी, हरभरा पिके जोमात असल्याचे चित्र आहे.
सातारा तालुक्यात रब्बी ज्वारी 8 हजार 549, गहू 488, मका 95, हरभरा 749, इतर कडधान्य 10, करडई 2, सूर्यफूल 1 असे मिळून 9 हजार 913 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जावली तालुक्यात रब्बी ज्वारी 3 हजार 986, गहू 220, हरभरा 330 असे मिळून 4 हजार 536 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पाटण तालुक्यात रब्बी ज्वारी 5 हजार 245, गहू 400, हरभरा 1 हजार 728, इतर कडधान्य 54, असे मिळून 14 हजार 251 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कराड तालुक्यात रब्बी ज्वारी 3 हजार 929, गहू 480, मका 3, इतर तृणधान्य 4 हजार 411, हरभरा 743 असे मिळून 5 हजार 154 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
कोरेगाव तालुक्यात रब्बी ज्वारी 13 हजार 690, गहू 1 हजार 340, हरभरा 2 हजार 200, कडधान्य 6 हजार 530 असे मिळून 21 हजार 560 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खटाव तालुक्यात रब्बी ज्वारी 17 हजार 581, गहू 2 हजार 949, मका 3 हजार 468, हरभरा 4 हजार 81 असे मिळून 28 हजार 79 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माण तालुक्यात रब्बी ज्वारी 13 हजार 829,गहू 629, मका 2 हजार 629, हरभरा 720 असे मिळून 17 हजार 806 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
फलटण तालुक्यात रब्बी ज्वारी 11 हजार 4, गहू 1 हजार 809, मका 4 हजार 9, हरभरा 901 असे मिळून 17 हजार 792 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खंडाळा तालुक्यात रब्बी ज्वारी 6 हजार 560, गहू 1 हजार 280, हरभरा 810 असे मिळून 8 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वाई तालुक्यात रब्बी ज्वारी 7 हजार 209 हेक्टर, गहू 1 हजार 460 हेक्टर, हरभरा 747 असे मिळून 9 हजार 513 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात गहू 15 हेक्टर, हरभरा 6 हेक्टर असे मिळून 21 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.