सातारा विधानसभा 
सातारा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यात 17 जण इच्छुक

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार कराड दक्षिण वगळता जिल्ह्यातील इतर आठ मतदारसंघांतून 17 जणांनी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघामधून सर्वात जास्त 13 उमेदवार इच्छुक आहेत.

त्यामध्ये राजेंद्र भाऊ पाटोळे, अभय धोंडीराम वाघमारे, लक्ष्मण बापुराव माने, अमोल गुलाब आवळे, दिगंबर रोहिदास आगवणे, वैभव शंकर पवार, रमेश तुकाराम आढाव, बुवासाहेब पंडीत हुंबरे, डॉ. राजेंद्र विष्णू काकडे, प्रा. डॉ. बाळासाहेब शंकरराव कांबळे, डॉ. अनिल सिताराम जगताप, घनश्याम राजाराम सरगर, बापूसाहेब तुकाराम जगताप यांचा समावेश आहे.

वाई मतदारसंघासाठी सात उमेदवार इच्छुक आहेत. वाईमधून स्वर्गीय खा. प्रतापराव भोसले यांचे नातू यशराव मोहन भोसले यांनीही थोरल्या पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. तसेच वाईतून दत्तात्रय उर्फ बंडू सर्जेराव ढमाळ, अनिल बुवासाहेब जगताप, डॉ. नितीन उत्तमराव सावंत, रमेश नारायण धायगुडे-पाटील, कैलास सदाशिव जमदाडे, निलेश लक्ष्मण डेरे यांनीही उमेदवारी मागितली आहे.

कोरेगाव मतदारसंघासाठी आ. शशिकांत जयवंतराव शिंदे हे एकमेव इच्छूक आहेत. माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर कृष्णाजी देशमुख, माजी आमदार प्रभाकर देवबा घार्गे, अभयसिंह खाशेराव जगताप, अनिल शिवाजीराव देसाई हे इच्छूक आहेत. कराड उत्तरमधून आ. बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील, पाटणमधून सत्यजित विक्रमसिंह पाटणकर, सातारा-जावलीतून दीपक साहेबराव पवार, शफीक कासम शेख यांनी उमेदवारी मागितली आहे.

पवार ऐनवेळी गुगली टाकण्याची शक्यता

प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. 15 दिवसांच्या मुदतीत 17 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने एकापेक्षा जादा उमेदवार जिथे मागणी करत आहेत, तिथे यादीतील उमेदवारांऐवजी वेगळ्या उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT