सांगली

हणमंतवडियेत शॉर्टसर्किटमुळे वीस एकरांतील ऊस जळाला

अनुराधा कोरवी

कडेगाव : हणमंतवडिये (ता.कडेगाव) येथे विद्युत वाहक तार तुटल्याने स्पार्किंग होऊ शॉर्टसर्किटमुळे सुमारे वीस एकरांतील ऊस जळून खाक झाला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

तालुक्यात ताकारी व टेंभू योजनेचे पाणी आल्याने सर्वत्र उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला हणमंतवडिये गावही अपवाद नाही. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास येथील शिवारातून गेलेल्या विद्युत वाहक तार अचानक तुटून येथील ऊस पिकावर पडली. शॉर्टसर्किट होऊन वीस एकरोतील ऊस जळून खाक झाला. यावेळी येथील तरुणांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी हानी टळली.

या आगीत नाथा नामदेव येवले, प्रवीण गोरखनाथ मोरे, आनंदा शंकर नलवडे, दत्तात्रय अरुण मोरे, महादेव भागवत मोरे-पाटील, हेमंत पितांबर मोरे, सुरेश हिंदुराव मोरे, संपत धोंडीराम मोरे, नलिनी विनायक मोरे, संग्राम प्रतापसिंह पाटील या शेतकर्‍यांचा ऊस आगीत भस्मसात झाला.

SCROLL FOR NEXT