सांगली

सांगलीत केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात येथे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारची चुकीची धोरणे, महागाई आदी विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीतर्फे येथे मटकाफोड व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये रेखाताई लोहार, रंजना गडदे, सुनील चव्हाण आदी सहभागी झाले होते. आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारच्या जागेमध्ये वसाहत स्थापन करून त्यांना कायमची घरे बांधून देण्यात यावीत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व मागासवर्गीयांसाठी बंद असलेल्या योजना त्वरित सुरू कराव्यात, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

SCROLL FOR NEXT