सांगली

सांगली: ‘सिव्हिल’साठी 233 कोटींचा निधी

मोनिका क्षीरसागर

सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगली सिव्हिल रुग्णालयासाठी 233.34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांनी ही मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. तसेच आहे त्या यंत्रणेवर ताण पडत आहे. खाटांच्या अपुर्‍या संख्येमुळे रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत आहे.

या हॉस्पिटलच्या ठिकाणी नव्याने 500 खाटांची सोय असलेली अद्ययावत चार मजली इमारत उभी करण्यात यावी, त्याचबरोबर निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि शवागाराची गरजही पूर्ण करावी, अशी मागणी घेऊन आपण ना. देशमुख यांची भेट घेतली होती. त्यांनी नव्या हॉस्पिटलसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मी प्रस्ताव पाठवला.

ते पुढे म्हणाले, हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पुढील मंजुरीसाठी पाठविला. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला आणि त्यासाठीच्या खर्चाला मंजुरी मिळाली. पाटील म्हणाले, या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मी गेली चार महिने ना. देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

त्यामुळेच या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. आता लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सध्याच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या मोकळ्या जागेत नव्या सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होईल. साधारणपणे 52 हजार, 673 स्क्वेअर मीटरचे बांधकाम होणार आहे. नव्या हॉस्पिटलच्या कामासाठी पालकमंत्री ना. जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांचेही सहकार्य लाभले, असे पाटील यांनी सांगितले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT