सांगली

सांगली : लाचखोर शिक्षणाधिकारी, अधीक्षकाचे निलंबनाचे प्रस्ताव

निलेश पोतदार

सांगली : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांच्याबाबत झालेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत विभागाकडून आलेला आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र डुडी यांनी
दिली.

कांबळे व सोनवणे यांना एक लाख 70 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरावर छापे टाकून
झडती घेतली. कांबळेच्या घरातून दहा लाख रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सोनवणेच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंधककडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला. त्यानुसार पुढील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डुड्डी यांनी दिली.

माध्यमिक शिक्षण विभागात शुकशुकाट

येथील जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागात नेहमी शिक्षकांची वर्दळ असते. शुक्रवारी शिक्षणाधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते.त्यामुळे या परिसरात शुकशुकाट होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT