सांगली

सांगली : मतदारसंघातील रस्त्यांसाठी 55 कोटी मंजूर

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  पावसाळी अधिवेशनामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.

आमदार गाडगीळ म्हणाले, या 11 रस्त्यांसाठी हरिपूर ते अंकली रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे (5 कोटी), खोतवाडी ते नांद्रे रस्ता सुधारणा (6 कोटी), माधवनगर जकात नाका ते म्हसोबा जंक्शन रस्ता रुंदीकरणासह सुधारणा (6 कोटी), समडोळी ते सांगलीवाडी रस्ता सुधारणा (5 कोटी), सांगली आकाशवाणी ते शामरावनगर ते हनुमान नगर ते हसरा चौक रस्ता सुधारणा (1.5 कोटी), मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्त्याची सुधारणा (4 कोटी), कदमवाडी ते सांगली वाडी रस्त्याची रुंदीरकरणासह सुधारणा (3.5 कोटी), शिरगाव फाटा ते खोतवाडी व बिसूर ते बुधगाव रस्ता सुधारणा (6 कोटी), कर्नाळ रोडवरील म्हसोबा मंदिर ते मौजे डिग्रज ते ब्रम्हनाळकडे जाणारा रस्ता सुधारणा (7 कोटी), कर्नाळ ते म्हसोबा मंदिर रस्ता सुधारणा (6 कोटी), कुपवाड रोड अहिल्यानगर ते सांगली-मिरज रोडवरील हनुमान मंदिरपर्यंत रस्ता सुधारणा असा एकूण 55 कोटी रुपयांचा निधी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.

दोन पुलांसाठी 16 कोटी लवकरच
'नाबार्ड'मधून शास्त्री चौक हरिपूर रोडवरील लहान पुलाचे बांधकाम (4 कोटी), नावरसवाडी फाटा जवळील लहान पुलाचे बांधकाम (12 कोटी) अशी एकूण 16 कोटीची कामे मंजूर होतील, अशी माहितीही आमदार गाडगीळ यांनी दिली.

SCROLL FOR NEXT