सांगली

सांगली : बुधगावमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न

अनुराधा कोरवी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्टेट बँकेचे बुधगाव (ता. मिरज) येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य रस्त्याकडेला स्टेट बँकेचा एटीएम कक्ष आहे. तिथे दोन एटीएम मशीन आहेत. सीटीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र सुरक्षारक्षक नाही. गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने एटीएम कक्षात प्रवेश केला. मशिनसमोरील खालचा दरवाजा उचकटून त्यामधील पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांना यश आले नाही. शुक्रवारी सकाळी एटीएममधून पैसे काढण्यास काही लोक गेले होते. त्यावेळी त्यांना मशिनचा दरवाजा उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेशी संपर्क साधून याची माहिती दिली.

ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बँकेचे शीतल लहू कोपार्डे (वय ४२, रा. हरिपूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. एटीएम कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र तो सुरू आहे का नाही, याबद्दल साशंकता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT