सांगली

सांगली : पाच नगरपालिकांच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर

मोहन कारंडे

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत सोमवारी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे काही ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर अपेक्षीत आरक्षणाची घोषणा झाल्याने इच्छुक उमेदवार आनंदीत झाले आहेत. निवडणूक होणार्‍या भागात आता राजकीय वातावरण तापणार आहे.

इस्लामपूर नगर परिषदेच्या 15 प्रभागातील 30 जागेंसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 4 व 6 अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच प्रभाग क्र. 5 व 15 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. प्रभाग 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 यामध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, असे आरक्षण असणार आहे. आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बारा प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. येथे एकूण 24 सदस्यांपैकी 12 जागा महिलांसाठी तर 12 जागा पुरूष उमेदवारांसाठी आहेत. यातील अनुसूचित जातीसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 महिला व 2 पुरूषांचा समावेश आहे. सर्वसाधारण खुल्या गटासाठी 20 जागा आहेत.

पलूस नगरपरिषदेच्या 10 प्रभागातील 20 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 3 अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे प्रत्येकी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण वर्गाकरिता आरक्षित करण्यात आले आहे.

तासगाव नगरपालिकेच्या एकूण 12 प्रभागातील 24 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यातील 11 ठिकाणी सर्वसाधारण खुले आरक्षणाची सोडत निघाली आहे. तसेच 11 जागा सर्वसाधारण महिला आरक्षित असणार आहेत. तसेच प्रभाग 11 साठी सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती तर प्रभाग 12 साठी अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. विटा पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतीत प्रभाग 5, 9, 11 आणि 12 हे प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तसेच उर्वरीत सर्व प्रभागात प्रत्येकी एक महिला आणि एक सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे.

शिराळा नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 15 अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5, 10, 11, 16, 17 सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 4, 6, 7, 8, 9, 12, 13 हे प्रत्येकी सर्वसाधारण वर्गाकरिता खुले आरक्षित करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT