सांगली

सांगली : धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू

दिनेश चोरगे

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा :  कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत असताना गजानन शंकर दाभोळे (वय 18, सध्या रा. सुपर इंजिनिअरिंग कुपवाड एमआयडीसी, मूळ गाव हुबळी कर्नाटक) या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मयत गजानन दाभोळे या तरुणाचे वडील कुपवाड एमआयडीसीतील सुपर इंजिनिअरिंग या कंपनीत रखवालदार म्हणून काम करीत आहेत. दाभोळे हा आई, वडील, बहीण असे तिघेजण कंपनीतील एका खोलीत राहत आहेत. दाभोळे हा तरुण मंगळवारी सकाळी कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकी समोरील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत असताना तो अचानक रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू
झाला.

या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दाभोळे याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT