सांगली

सांगली : देखावे पाहण्यासांठी एकच गर्दी

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. लोकांच्या गर्दीने सांगलीतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या खंडानंतर यावेळी प्रथमच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे.

सांगलीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध विषयांवर देखावे उभारले आहेत. वखारभाग, कॉलेज कॉर्नर, राजवाडा चौक, विजयनगर, शंभर फुटीसह परिसरात गणेशोत्सव मंडळांनी देखावे उभारले आहेत. स्टेशन चौक, कॉलेज कॉर्नर परिसरात गणेशोत्सवानिमित्त पाळणेदाखल झाले आहेत. खासकरून तरुणाईला या पाळण्यांनी चांगलेच आकर्षक केले आहे. येथे पाळण्यात बसण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होत असते.

शहरात देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहकुटुंब सांगलीत येत आहेत. तसेच रात्रीपर्यंत देखावे पाहून नंतर अनेकवेळा हॉटेलमध्ये जेवण करूनच हे भाविक गावाकडे परतत आहेत. यातून हॉटेल चालकांत चांगलेच खुशीचे वातावरण आहे. दरम्यान, शहरात अनेक गणेश मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीचा योग साधून याचे प्रमाण मोठे होते. गणेशभक्तांनी विविध मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा लाभ घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT