सांगली

सांगली : दिवाळीनंतर उडणार ग्रामपंचायत निवडणुकांचा बार

दिनेश चोरगे

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्या. दिवाळीनंतर तालुक्यातील मुदत संपलेल्या 88 ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादी व भाजपमध्येच लढत पाहायला मिळणार आहे. काही गावांतून काँग्रेस व शिवसेनेचेही प्राबल्य आहे.

बनेवाडी, भरतवाडी, चिकुर्डे, फार्णेवाडी (बो.), गाताडवाडी, जक्राईवाडी, कार्वे, कासेगाव, कोळे, कोरेगाव, मालेवाडी, मरळनाथपूर, मिरजवाडी, नागाव, नरसिंहपूर, नायकवाडी, नेर्ले, पडवळवाडी, रेठरेधरण, रोझावाडी, शेखरवाडी, शेणुरूल, तुजारपूर, वाघवाडी, येवलेवाडी, ताकारी, अहिरवाडी, बहादूरवाडी, बावची, बिचूद, बोरगाव, ढगेवाडी, धोत्रेवाडी, दुधारी, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि.), हुबालवाडी, इटकरे, जांभुळवाडी, काकाचीवाडी, करंजवडे, शिगाव, खरातवाडी, कुंडलवाडी, किल्लेमच्छिंद्रगड, लाडेगाव, शिरगाव, लवंडमाची, महादेववाडी, वशी, ढवळी, माणिकवाडी, नवेखेड, शिवपुरी, तांदुळवाडी, बेरडमाची, ठाणापुडे, विठ्ठलवाडी, ऐतवडे बुद्रुक, देवर्डे, कामेरी, ओझर्डे, डोंगरवाडी, वाटेगाव, अघबकवाडी, बहे, बागणी, गौंडवाडी, कुऱळप, पेठ, येडेमच्छिंद्र, येलूर, वाळवा, भडकंबे, जुनेखेड, मर्दवाडी, पोखर्णी, भवानीनगर, रेठरेहरणाक्ष, साखराळे, गोटखिंडी, काळमवाडी, येडेनिपाणी, कापूसखेड, ऐतवडे खुर्द, केदारवाडी, कणेगाव येथे निवडणुका होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT