सांगली

सांगली : जतमध्ये एमआयडीसी उभारणार : उदय सामंत यांचे जत दौर्‍यात जनतेला आश्वासन

मोहन कारंडे

जत; पुढारी वृत्तसेवा : जतमध्ये 51 आणि 26 हेक्टर अशा दोन शासनाच्या जागा आहेत. याठिकाणी लघु व मध्यम उद्योगनगरी साकारण्याठी या संदर्भात लवकरच बैठक घेणार आहे. आचारसंहितेमुळे काही बोलता येणार नाही. पण जतला एमआयडीसी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जत तालुक्यातील जनतेला दिले.

उद्योगमंत्री उदय सामंत हे सोमवारी जत तालुक्याच्या दौर्‍यावर होते. या दोर्‍यात त्यांनी जत तालुक्यातील पाणीप्रश्न, आद्योगिक अडचणी व अन्य प्रश्नांची माहिती घेतली. यानंतर जनतेशी आणि पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सामंत म्हणाले, विस्तारित म्हैशाळ योजनेसंदर्भातील निधीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी यापूर्वीच घेतला आहे. त्याची प्रत्यक्षात लवकरच कार्यवाही होणार आहे. तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे, इथल्या भागाचा विकास व्हावा, लोकांची पाण्यासह एमआडीसीची मागणी आहे. मी उद्योगमंत्री असल्याने येताना माहिती घेऊन आलो आहे. भले चार दौरे अजून काढायला लागले तरी येऊन या भागातील लोकांचे दु:ख, समस्या सोडवणार आहे, असे सामंत म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत जत सीमावर्ती भागाचा दौरा केला. गुड्डापूर, माडग्याळ, मायथळ कॅनॉल, तिकोंडी, उमदी येथील नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि लोकभावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत व संपर्कप्रमुख योगेश जानकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक भागातील पाण्याचा प्रश्न तालुक्यातील रिक्त पदांचा अनुशेष, विजेचा प्रश्न, सीमावर्ती भागातील मराठी शाळेचा प्रश्न प्राधान्याने सोडणार आहे. यासाठी शासन विशेष प्रयत्नशील व सकारात्मक आहे. मला मुख्यमंत्री शिंदे यांनी तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजेत, यासाठी पाठवून दिले आहे. तातडीने यासंदर्भात मंत्री शिंदे यांच्याकडे तालुक्यातल्या समस्या विषयी सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रश्न मार्गी लागणार आहेत.

SCROLL FOR NEXT