सांगली

सांगली : गोरगरिबांच्या झोपड्यांवरही फडकला तिरंगा

अमृता चौगुले

नागज (सांगली); पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घराघरांवर तिरंगा लहरत आहे. नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे भटकंती करत येऊन राहिलेल्या लोकांच्या पालावरही मोठ्या डौलाने तिरंगा फडकताना दिसत आहे.

शासनाच्या 'हर घर तिरंगा' या योजनेअंतर्गत शनिवारपासून ग्रामीण भागातील घराघरांवर तिरंगा फडकताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागज येथील गरिबांच्या झोपडीवर तिरंगा लावला नसल्याचे नागज येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. संजयकुमार घेरडे यांच्या लक्षात आले. त्यांनी झोपड्यांमधील लोकांना स्वखर्चातून तिरंगा झेंडे उपलब्ध करून दिले. प्रा. घेरडे म्हणाले, नागज येथील गरिबांच्या झोपडीवर तिरंगा लावला नसल्याचे लक्षात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना तिरंगा दिला. त्यांना त्यांच्या झोपडीवर तिरंगा लावण्यास मदत केली. सोमवारी झोपडीतील प्रत्येकाला जिलेबी वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT