सांगली; पुढारी वृत्तसेवा : पुढारी 'कस्तुरी क्लब' तर्फे रविवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गरबा रास दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सेव्हन अव्हेन्यू मार्ट, कोल्हापूर रोड, सांगली येथे सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. कार्यक्रमाला झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील शिवानी नाईक (आप्पी) व रोहित परशुराम (अर्जुन) यांची खास उपस्थिती असणार आहे. उपस्थित महिलांना कलाकारांसोबत गरबा खेळण्याची आणि खुमासदार गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. सेव्हन अव्हेन्यू मार्ट व विजय खेत्रे (उत्कर्ष भोजनालय) हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
सोबतच सुमित डान्स अॅकॅडमी प्रस्तुत 'जागर स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सभासदांना विविध स्पॉट गेम्समधून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून, याचा ड्रेस कोड गुजराती साडी किंवा घागरा असा आहे. कार्यक्रमात उत्तम वेशभूषेसाठी बक्षीस देण्यात येणार आहे.
आजच कस्तुरी सभासद व्हा आणि मिळवा बॉस कंपनीचा स्टील कोटेड थर्मास व विविध कार्यक्रमांचा आनंद लुटा. सभासद नोंदणी फी रुपये 600 मात्र. सभासद नोंदणीसाठी संपर्क : पुढारी भवन, जिल्हा परिषद समोर, सांगली – मिरज रोड, सांगली. 9607957576