कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले कडेगाव मोहरम गगनचुंबी ताबुतांची उभारणी पूर्ण झाली असून शनिवारी (दि.29) रोजी ताबूतांचा भेटी सोहळा होणार आहे. या भेटी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत होणार आहेत. सकाळी 11 वाजता पाटील वाडा येथे पहिली भेट, तर दुपारी 1 वाजता सुरेशबाबा देशमुख चौक-मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा होणार आहे.
शुक्रवारी (दि.28) पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने फातेहा होवून ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यातून अंबिल मिरवणूक काढण्यात आली. ती पिरजादे वाड्यातून मसूदमाता बारा इमाम येथे नेण्यात आली. कत्तलरात्र असल्याने मानाचा सातभाई ताबुतांसह सर्वच ताबुतांजवळ व मसूदमाता येथे लोकांनी लक्षणीय गर्दी केली होती.
उपअधीक्षक -1, पोलिस निरीक्षक – 5, सहायक पोलिस निरीक्षक – 4, पोलिस उपनिरीक्षक -12, पोलिस – 15, होमगार्ड – 30, दंगल काबू पथक – 2