सांगली

शेतीच्या पाणीपट्टीची आता ऑनलाईन वसुली

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांची पाणीपट्टी आता क्यूआरकोडद्वारे वसूल करण्यात येणार आहे. कर्मचारी क्युऑरकोडद्वारे लाभधारक शेतकर्‍यांची पाणीपट्टी जागेवरच वसूल करू शकतो. लाभधारक शेतकर्‍यांची पाणीपट्टी भरणा झाल्याची पोहच ऑनलाईन पहाता येणार आहे. पाणीपट्टी वसुलीत सुलभता व पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे या वसुलीला सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

सध्या जलसंपदा विभागाकडून पारंपरिक पध्दतीने लाभधारक शेतकर्‍यांची सिंचन पाणीपट्टी वसुली सहकारी साखर कारखान्यामार्फत व प्रत्यक्ष रोखीने केली जाते. परंतु यामुळे अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी आता पाटबंधारे विभागा कडून ऑनलाईन पद्धतीने क्यूआरकोडद्वारे पाणीपट्टी वसूल करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT