मिरज : पुढारी वृत्तसेवा
मिरज – मालगाव रस्त्यावरील दत्त कॉलनी येथे घर बांधकामाची वीट नेल्याचा जाब विचारल्याने दोघींना मारहाण करण्यात आली. यामध्ये धनश्री लिंगाप्पा शेट्टी आणि त्यांची आई जखमी झाल्या आहेत.
मारहाण प्रकरणी सखुबाई सुभराव वाघमारे, संगीता सुभराव वाघमारे, नैना सुभराव वाघमारे आणि दुर्गा सुभराव वाघमारे (सर्व रा. दत्त कॉलनी, मिरज) यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धनश्री शेट्टी यांच्या घराचे पत्रे फुटल्याने ते बदलण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी शेट्टी यांनी वीट आणली होती. त्यातील काही विटा हे वरील संशयित शेट्टी यांची परवानगी न घेता घेऊन जात असल्याचे शेट्टी यांच्या आईच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी जाब विचारला असता त्यांना मारहाण करण्यात आली. आईला होत असलेली मारहाण सोेडविण्यासाठी धनश्री शेट्टी या गेल्या असता त्यांनाही सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यापैकी नैना वाघमारे हिने धनश्री यांचा चावा घेतला. संगीता वाघमारे हिने विटेने मारहाण केल्याचे शेट्टी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.