सांगली

मिरजेत चाकूहल्ला; एक जखमी

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या मिरजेतील सुभाषनगरमधील अर्चना बाळासाहेब गायकवाड (वय 32) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किरण लकाप्पा तांबे (रा. सुभाषनगर) याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना गायकवाड यांचे पती हे रंगा पाटील यांच्या शेतात कामाला गेले होते. तिथे संशयित तांबे याच्यासोबत पतीचा वाद झाला होता. तांबे याने पतीला मारहाण केली होती. घरी आल्यानंतर पतीने हा प्रकार सांगितला. अर्चना गायकवाड व त्यांचा मुलगा प्रतीक हे तांबेला जाब विचारण्यासाठी गेले. त्यांनी 'माझ्या वडिलांना का मारहाण केली', अशी विचारणा केली. यावर तांबे याने 'तू कोण मला विचारणार', असे म्हणून घरातील सुरी आणून त्याच्यावर हल्ला केला.  प्रतीकने हा हल्ला चुकविला. अर्चना गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी गेल्या. त्यावेळी चाकूचा घाव त्यांच्या हातावर बसला. यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविले. रात्री उशिरा त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस याचा तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT