सांगली

मिरज : खटावमध्ये भाजपचा विजय

backup backup

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : खटाव (ता. मिरज) येथे भाजपचे उमेदवार श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार रावसाहेब बेडगे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली आहे. त्यामुळे खटावमध्ये व्हणाणावर – बेडगे गटाचीच पुन्हा सरशी झाली आहे. सत्ताधारी बेडगे गटास पुन्हा 12 जागा व सरपंचपद तर विरोधी गटास केवळ एक जागा मिळाली आहे.

बारा सदस्यासह विजय झाल्यामुळे गावामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. गावातील प्रमुख लढत दोन गटांमध्ये चुरशीने मतदान झाले होते. मात्र, निकाल एकतर्फी लागला असल्याचे दिसून येते. सरपंचपदाचे उमेदवार रावसाहेब बेडगे यांना एकूण 1817 मते मिळाले असून विरोधी गटाचे सरपंच पदाचे उमेदवार पी. जी. पाटील यांना 1284 मते मिळाली आहेत. 531 मतांनी विजय खेचला आहे. सरपंचपदासाठी पाच उमेदवार उभे असल्याने वरकरणी पंचरंगी असणारी निवडणूक असली तर प्रत्यक्ष बेडगे व पी. जी. पाटील यांच्यातच लढत झाली. उर्वरित उमेदवार यांनी मते काही घेतली असली तरी बेडगे यांच्या विजयावर त्याचा परिणाम झाला नाही इतक्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत.

विजयानंतर रावसाहेब बेडगे बोलताना म्हणाले, तालुक्याचे आमदार व मंत्री सुरेश खाडे व खासदार संजय पाटील यांची साथ, विकास सोसायटीचे चेअरमन व पॅनेलप्रमुख बाळासाहेब व्हणानावर यांचे अचूक नियोजन व मार्गदर्शन, सूत्रे हलवण्यात हातखंडा असणारे संतोष वाटवे, सुरेश परीट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नामुळे गावामध्ये सरपंचपदी निवडून आलो. पॅनेलचे बारा सदस्य निवडून आणण्यात या सर्वांचा मोठा वाटा आहे.

जनतेने मंजूर पेयजलचे काम, रस्तेकाम व अन्य कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याने हा विजय पदरात दिला आहे. झालेली विकासकामे पाहूनच जणू पुन्हा या निकालाने होणार्‍या विकासकामांना संधी दिली आहे, असे म्हणावे लागेल.

बेडगे सरपंच व सदस्य दोन्ही पदावर विजयी :

खटाव गावाचे पूर्ण लक्ष वॉर्ड क्रमांक 3 कडे होते. यामध्ये सरपंचपदाचे उमेदवार रावसाहेब बेडगे हे सदस्यपदासाठीही वॉर्ड क्रमांक 3 मध्ये उभे होते. येथे पी. जी. पाटील यांचा मुलगा गुरुपाद पाटील यांनाही त्यांनी पराभूत केले आहे. त्यामुळे सरपंचपदी व सदस्यपदी दोन्ही ठिकाणी निवडून आल्याने येथे पोटनिवडणूक लागणार आहे.

बेडगे गटाचे विजयी सदस्य असे : गणपती यशवंत चांभार, धोंडूबाई वडर, पारुबाई शिवगोंडा व्हणाणावर, व्हनाप्पा बाबुराव व्हणाणावर, रंजना कांबळे मोनाली लोहार, रावसाहेब बेडगे, सीता परीट, रवींद्र नाईक, वैशाली घोरपडे, संभाजी पारोजी, संगाप्पा पाटील, विरोधी गटाचे विजयी एकमेव सदस्य : सुवर्णा कागवाडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT