मिरज; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय पॅसेंजर मिनिटी समितीमार्फत गुरुवारी मिरज स्थानकाची पाहणी करण्यात आली. स्थानकामध्ये असणार्या सेवा सुविधा तसेच असुविधाबाबत समितीकडून रेल्वे बोर्डाकडे अहवाल देण्यात येणार आहे. केंद्रीय पॅसेंजर मिनिटी समितीकडून देशभरातील सर्व रेल्वेस्थानकांची पाहणी केली जाते. या समितीमधील जी. उमराणी (तेलंगणा), छोटूभाई पाटील (गुजरात) आणि कैलास वर्मा (महाराष्ट्र) या त्रिसदस्यीय समितीने गुरुवारी मिरज रेल्वे स्थानकाला भेट दिली.
यावेळी समितीकडून रेल्वे स्थानकातील सेवा सुविधा तसेच असुविधेबाबत टिप्पणी तयार करण्यात आली असून ती रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या त्रिसदस्यीय समितीची मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील, सदस्य ज्ञानेश्वर पोतदार आणि राकेश कुकरेजा यांनी भेट घेतली. त्यावेळी मिरज रेल्वे कृती समितीकडून मिरज रेल्वे स्थानकामध्ये विविध सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन दिले.
रेल्वे कृती समितीकडून करण्यात आलेल्या मागण्यांची टिप्पणी केंद्रीय समितीने केली असून या मागण्या देखील रेल्वे बोर्डाकडे देण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे.