सांगली

‘माझी वसुंधरा’मध्ये सांगली महानगरपालिका सर्वोत्तम

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला राज्यातील अमृत शहरामधुन सवोत्तमपैकी एक कामगिरी केल्याचे जाहीर झाले आहे. रविवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव होणार आहे. माझी वसुंधरा अभियांनातंर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या शहरांमध्ये महानगरपालिकेचा समावेश झाला आहे.

पंच तारांकित घर, पर्यावरण दुतांचा आज सत्कार

माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पंचतारांकित घर, पर्यावरण दूत तसेच महानगरपालिकेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांचा गौरव सोहळा रविवारी सायंकाळी 5 वाजता आयएमए हॉल येथे होणार आहे. शंभरी पार केलेल्या गोरखचिंच या वृक्षाचे पूजन होणार आहे. माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी 2023 साठी महापालिकेने आंतराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी, सिनेअभिनेते उमाकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, 'कंपोस्ट खत'च्या प्रचारक संपदा पाटील यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्यांचा सत्कार तसेच पंचतारांकित घर स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या घरमालकांचा, पर्यावरण दुतांचा सत्कार होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT