पंढरपूर : अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणार्या पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडला आहे. पोषण आहाराबाबत असा निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक घटना कासेगाव (ता. पंढरपूर) येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमधील पोषण आहार वाटप करताना घडली आहे. या घटनेमुळे लहानग्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.