सांगली

पलूस नगरपरिषद : …यांना बसला आरक्षणाचा धक्का

दिनेश चोरगे

पलूस ; तुकाराम धायगुडे :  पलूस नगरपरिषदेत प्रभाग रचनेत बदल होवून नव्याने तयार केलेल्या प्रभाग रचना व आरक्षणाने सत्ताधारी व विरोधकांमधील मातब्बर इच्छुकांना धक्का दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

यावेळी पलूस नगरपरिषदेत 10 प्रभाग असल्याने 4 नगरसेवक वाढणार आहेत. आरक्षण प्रक्रियेनंतर प्रभाग क्रमांक दोन व तीनमधील इच्छुकांमध्ये 'कही खुशी, कही गम' चे वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रभागांत बाहेरील लोकांना उमदेवारी द्यावी लागणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

आगामी काळात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडून नवीन उमेदवारांनादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागावर तगडा उमेदवार देण्यासाठी पक्षपातळीवर हालचाली गतिमान होत आहेत. यावेळी मतदार संख्या 26151 असून एकूण 10 प्रभागांत उमेदवार संख्या 20 असणार आहे.

गत नगरपरिषद निवडणूक ही स्थापनेतील पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे नागरिकांना आणि नगरसेवकांना ग्रामपंचायत आणि नगरपरिषद यांचा कारभार समजायला वेळ लागला. पण, गेल्यावेळी 8 प्रभागातून 17 उमेदवार उभे होते. नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडण्यात आले होते. पण, यावेळी नगराध्यक्षही निवडून आलेल्यांतून होणार असल्याने चुरस वाढणार आहे. परंतु, नगराध्यक्ष आरक्षण निवडणुकीनंतरच होणार आहे.

गत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने 13 जागा, भाजपाने एक जागा तर पलूस स्वाभिमानी विकास आघाडीने 4 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे पलूस नगरपरिषदेची एकहाती सत्ता काँग्रेसकडेच होती.
या निवडणुकीत प्रभाग रचना आणि आरक्षणाचा टप्पा पूर्ण झाल्याने निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडल्यामुळे त्या समाजाच्या मतांचाही विचार होणे अपेक्षित आहे. आरक्षणानंतर इच्छुकांचे पक्ष श्रेष्ठींकडे हेलपाटे वाढतील.
पण, नगरपरिषदेच्या येणार्‍या दुसर्‍या टर्ममुळे मतदार यावेळी सत्ताधार्‍यांनी गेल्यावेळी केलेल्या कामांचा लेखाजोखा समोर ठेवूनच मतदान करणार असल्याने पक्ष, गटतटापेक्षा कामाच्या जोरावरच ही निवडणूक होईल, असेच एकंदरीत चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT