सांगली

जतमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

backup backup

जत शहर : पुढारी वृत्तसेवा : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

मेघडंबरीत पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सायंकाळी धनगरी ओव्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी विविध मान्यवरांनी मूर्तीस अभिवादन केले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा बँकेचे नूतन संचालक प्रकाश जमदाडे, बसवराज अलगूर महाराज, नगरसेवक लक्ष्मण एडके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तमराव चव्हाण, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, माजी प्रा. पांडुरंग वाघमोडे, प्रकाश माने, भैय्या कुलकर्णी, गौतम ऐवळे यांनी अभिवादन केले. यावेळी महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वैष्णवी एडके, सुनीता वाघमोडे, नगरसेविका बबिता मोटे, तेजस्विनी व्हनमाने आदींनी मनोगत व्यक्त केले.

सायंकाळी मूर्तीची फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोभायात्रा काढण्यात आली. संयोजन नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके, प्रा. राजू माने, संतोष मोटे, तानाजी गावडे, संजय गावडे, डॉ. प्रवीण वाघमोडे, भूषण माने, विजय खांडेकर, पिंटू व्हनमाने, योगेश एडके, प्रकाश मोटे, दादा तुराई, पृथ्वीराज गारळे, अवधूत पुजारी, विनायक गारळे यांनी परिश्रम घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT