सांगली

खा. संजय पाटील यांच्याकडून मनोहर भिडे यांचा तीव्र निषेध

दिनेश चोरगे

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रपिता महात्मा गांधींजी यांच्याविषयी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सोमवारी तीव्र शब्दात निषेध केला. महात्मा गांधी यांना सारे जग मानते, त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशा शब्दात खासदार पाटील यांनी भिडेंना सुनावले.

पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत. त्यांचे कार्य जगाला दिशा देणारे आहे. सारे जग त्यांचा आदर करते. जगभर त्यांना मोठा मान आहे. अशा महान राष्ट्रपित्याविषयी चुकीचे वक्तव्य करणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. मी भिडे यांचा निषेध करत आहे. भिडे यांच्या समर्थकांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणीही कायदा हातात घेऊ नये.

बेडगमध्ये एकोपा नांदावा

बेडगमधील जातीय तणाव दुर्दैवी आहे. सारे गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असताना राजकारण करून दुही माजवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. दोन्ही समाजघटकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. गावात एकोपा नांदावा यासाठी मी प्रयत्न करत आहे.

SCROLL FOR NEXT