सांगली

ईडीचे स्वागत करतो, तुम्हीही तयार रहा; आमदार विक्रम सावंत यांचे जगताप यांना आव्हान

अमृता चौगुले

जत; पुढारी वृत्तसेवा : ज्यांनी आपल्या आयुष्यात तालुक्याच्या जनतेतील लोकहिताच्या भावनेशी खेळण्याचा उद्योग केला. गुंडगिरी, दशहत निर्माण करणे याखेरीज विकासाचे कोणतेही काम केले नाही. उलट तालुक्यात बार, लॉज, अवैध धंद्याची संस्कृती माजी आ. जगताप यांनीच आणली. 22 हजार सभासदांचा कारखाना मोडून खाणार्‍या जगतापांचीच ईडीने चौकशी करावी. मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असे प्रतिउत्तर आ. सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले.

आ. सावंत म्हणाले, माझ्यावर आरोप करण्यास जगताप यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. केवळ तुबची-बबलेश्वर, ईडी चौकशी, आदर्श घोटाळा याशिवाय त्यांच्याकडे तालुक्याचा विकासाचा प्रश्न नाही. जत पूर्व भागात मिळणारे पाणी कुठून येते याची माहिती जनतेला आहे. त्यामुळे जगताप यांच्या दिशाभूल करणार्‍या वक्तव्याचा कसलाही परिणाम होणार नाही. मी विधिमंडळात गेल्यापासून प्रत्येक अधिवेशनात बोलतो तालुक्याचे प्रश्न मांडतो जर तुम्ही स्वतःला अभ्यासू समजत होता. पाच वर्षात का बोलला नाही, असा सवाल सावंत यांनी केला.

मी तयार आहे, तुम्हीही तयार रहा

सावंत म्हणाले, मी ईडीच काय आणखीही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही फक्त कारखान्याच्या चौकशीला समोर जा, असे खुले आव्हान सावंत यांनी दिले. शिवाय जगताप यांनी 22 हजार कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला आहे. विकासाचा मानबिंदू केंद्रबिंदू असणारा कारखाना सेटलमेंट होऊन कमी दाराने विकला आहे, ही सगळी माहिती माझ्याकडे व जनतेकडे देखील आहे. आदर्श घोटाळ्यात आमची दोन वेळा चौकशी झाली आहे. अजून कुठली चौकशी लावणार असाल तर लावा

SCROLL FOR NEXT