सांगली

इस्लामपूर : जयंत पाटील यांनी 110 कोटींचा निधी दिला

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर नगरपालिकेत सत्ता नसतानाही माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडून इस्लामपूरच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी 110 कोटींचा निधी दिला असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड.चिमण डांगे यांनी केले.

इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा जाहीर करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, खंडेराव जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर उपस्थित होते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, नगरपालिकेतील सत्ताधारी गेल्या पाच वर्षात शहराचा विकास करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत. दादासो पाटील म्हणाले, नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांना 60 महिन्यात जे करता आले नाही ते आ. जयंत पाटील यांनी 6 महिन्यांत करून दाखविले आहे.

खंडेराव जाधव म्हणाले, आ. पाटील यांनी शहरातील रस्त्यासाठी जे 27 कोटी रुपये दिले होते. त्याचे व्याजासह 35 कोटी रुपये झाले होते. त्यातूनच विरोधकांनी भुयारी गटारीचे काम केले. त्यांनी राज्यात त्यांचे सरकार असताना एक रुपयांचा तरी निधी आणला का?

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे, संदीप पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, पीरअली पुणेकर, प्राचार्या दीपा देशपांडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, शकील जमादार, गोपाळ नागे, मोहन भिंगार्डे, गुरुराज माने, युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT