सांगली

अपघातात मिरजेतील तरुण ठार

backup backup

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा मिरज एमआयडीसीतील एका दवाखान्यासमोरील रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाला अज्ञात वाहन चालकाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. झहीर शब्बीर मुजावर (वय 19, रा. इदगाहनगर, मिरज) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

मयत झहीर मुजावर हा तरुण मिरज एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करीत होता. शुक्रवारी (दि.12) रात्री तो काम संपवून वडील शब्बीर मुजावर यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. मिरज एमआयडीसीतील एका दवाखान्यासमोरील रस्त्याच्या बाजूला झहीर याला उभे करुन वडील शब्बीर हे काही कामानिमित्त कुपवाड एमआयडीसीकडे गेले होते. दरम्यान, झहीर याला भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने धूम ठोकली. वडील शब्बीर घटनास्थळी आल्यावर त्यांना मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT