अपघातात दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकीचे झालेले नुकसान Pudhari Photo
सांगली

सांगली : विटा ते लेंगरे रस्त्यावरील अपघातात येतगावचा युवक ठार; एकजण जखमी

पुढारी वृत्तसेवा

विटा : पुढारी वृत्तसेवा

जोंधळखिंडी येथे विटा ते लेंगरे रस्त्यावर एका चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात येतगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय ज्ञानदेव मोहिते (वय २८, रा. येतगांव ता. कडेगांव) असे मृताचे नाव तर ओंकार राजेंद्र यादव (वय.१८) असे जखमी युवकाचे नाव आहे. हा अपघात सोमवारी (दि.16) सकाळी साडे अकरा वाजता घडला. याप्रकरणी मृताचा भाऊ अमोल मोहिते यांनी चारचाकी चालका विरोधात विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, येतगाव येथील विजय मोहिते हे लाईट दुरुस्तीची कामे करत होते. याच कामानिमित्त तालुक्यातील मादळ मुठी येथे विटा मार्गे गेले होते. सोमवारी सकाळी ते मादळमुठी येथून येतगावकडे मोटारसायकल (क्र. एमएच १० सीझेड २६६६) वरून परतत होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास विटा ते लेंगरे जाणारे रस्त्यावर जोंधळ खिंडी फाट्या पासून पुढे जाताना विट्याकडून येणारी चारचाकी गाडी (क्र. टी एन ०९ सी क्यु ०९९०) आणि मोटारसायकलची जोराची धडक झाली. या भीषण धडकेत विजय मोहिते याचा मृत्यू झाला. तर मोटार सायकलवर मागे बसलेला ओंकार यादव हा युवक जखमी झाला. जखमी ओंकार यादव याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर चारचाकी गाडी थेट रस्त्याकडेच्या नाल्यात गेली. त्यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. चारचाकी गाडीचा चालक निरज रामचंद्र पवार याने गाडी भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राँग साईडला जावून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला उडवले आणि आपला भाऊ विजय मोहिते याच्या मृत्यूस तो कारणीभूत आहे, तसेच स्प्लेंडर गाडीचेही नुकसान झाल्या चे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी संशयित वाहन चालक निरज रामचंद्र पवार (33 वर्षे, रा. यशवतनगर, विटा ता. खानापुर, जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT