Molestation case: वृध्देच्या विनयभंगप्रकरणी युवकास कारावास Pudhari
सांगली

Molestation case: वृध्देच्या विनयभंगप्रकरणी युवकास कारावास

घरात घुसून वृध्द महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय 29) याला 17 महिन्यांचा कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : घरात घुसून वृध्द महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय 29) याला 17 महिन्यांचा कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्रन्यायाधीश ए. एच. काशीकर यांनी ही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. हा विनयभंगाचा प्रकार सव्वा वर्षापूर्वी घडला होता.

पीडित वृध्दा घरात झोपली असताना आरोपी सोमनाथ हा घरात घुसला. त्याने वृध्देचा विनयभंग केला होता. वृध्देने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. नागरिकांनी सोमनाथ याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

न्यायाधीश काशीकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने बी.एन.एस.कलम 74, 333, 115 (2)या अन्वये दोषी धरून सोमनाथ याला 17 महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले. सहायक पोलिस फौजदार शरद जाधव, हवालदार उत्तम शिंदे, संदीप शेटे, सुनील पाटील यांनी सरकारी पक्षास मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT