कुरळप : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी हद्दीत रस्त्यालगत उभ्या केलेल्या ट्रकला धडकून येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील तरुणाचा मृत्यू झाला. रोहित संभाजी पवार (वय 30) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी मृत तरुणाचा मामा संजय शिंदे (रा. चावरे, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. अज्ञात ट्रकचालकाविरोधात कुरळप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रोहित पवार हा एमआयडीसी शिरोली येथून सोमवारी मोटरसायकल (एम. एच. 10, डी. यु .0923) वरून गावाकडे येत होता. दरम्यान, तांदुळवाडी येथे पुलाजवळ ट्रक (एम. एच.12, एस.एक्स.9991) हा वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावण्यात आला होता. या लावलेल्या ट्रकला मागील बाजूस रोहित पवार याची जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मृत झाला. मृत रोहित याची घरची परस्थिती बेताचीच आहे. तो आई-वडिलांना एकुलता एकहोता. वडील दूध संस्थेत कामाला आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो एमआयडीसीत कामाला जात होता. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल तानाजी बाबर करीत आहेत.