सांगली

Sangli Crime: कवलापुरात बालिकेशी अश्लील चाळे; तरुणाला अटक

मिरज तालुक्यातील एका गावात अवघ्या साडेपाच वर्षे वयाच्या बालिकेला ओढून तिच्याशी अश्लील चाळे करत लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात अवघ्या साडेपाच वर्षे वयाच्या बालिकेला ओढून तिच्याशी अश्लील चाळे करत लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयूर प्रकाश तोडकर (वय ३२, रा. सिद्धेश्वर गल्ली, कवलापूर, ता. मिरज) याला बुधवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या विनयभंगाची ही घटना २६ जून रोजी दुपारी घडली.

या प्रकरणी बालिकेच्या आजीने पोलिसात धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दिली आहे. पीडितेचे वय अवघे ५ वर्षे ७ महिने आहे. पीडित बालिकेची नातेवाईक महिला घराबाहेर कपडे वाळत घालत असतानाच बालिका तिथे खेळत होती. त्याच वेळी संशयित मयूर तोडकर हा तिथे आला आणि त्याने अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयिताच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) आणि भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT