सांगली : सातव्या पीएनजी महाकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने सादर केलेल्या चरचरणार्या फॅन्टसीचे युद्ध या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व जव्हेरीचे संचालक सिध्दार्थ गाडगीळ यांच्याहस्ते विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निकाल याप्रमाणे : द्वितीय- मॉडर्न महाविद्यालय (पुणे) वामन आख्यान, तृतीय क्रमांक-प्रेम की यातना, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर; उत्तेजनार्थ पहिला- मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे. बोहाडा; देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर-ग्वाही; दिग्दर्शन- कादंबरी माळी, चरचरणार्या फँटसीचे युद्ध., अनिकेत खरात- विराज दिघे, वामन आख्यान., दीपक शिंदे-प्रेम की यातना, स्त्री अभिनय : कादंबरी माळी-चरचरणार्या फँटसीचे युद्ध, केतकी भाळवणकर, वामन आख्यान, अक्षता बारटक्के- ग्वाही., पूर्वा जोतावर-दर्शन; संयोगिता चौधरी- सोयरीक, वैष्णवी कुंभार- हाफ वे, स्वरा जोग-अव्यक्त., मृणाल पाटील- मिठाई., पुरुष अभिनय - जैद शेख- प्रेम की यातना, प्रांज्वल पडळकर- वामन आख्यान, मुकुल ढेकळे- बोहाडा., अभिनव तोरणे- चरचरणार्या फँटन्सीचे युद्ध, अभिषेक हिरेमठ- स्वामी- ग्वाही, भूषण चांदणे- अ युसलेस जीनियस, राजस बर्वे- अव्यक्त, पार्थ पाटणे- ग्वाही., नेपथ्य-चिन्मय मोरे, आशुतोष देशमाने- एकांकिका- एका हाताची गोष्ट, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर. साहिल जाधव, एकांकिका - ग्वाही, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स ,कोल्हापूर., श्रावणी कुलकर्णी, आर्या काटे- एकांकिका- अव्यक्त- चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली., प्रकाश योजना : राज दीक्षित- एकांकिका- इन बिटवीन ऑफ - बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे, प्रतीक यादव -एक डॉट, ज्ञानेश पाटील, जीनियस., पार्श्वसंगीत : अनुद सरदेशमुख - प्रेम की यातना., शुभम चौगुले- चरचरणार्या फॅन्टसीचे युद्ध., प्रतीक्षा सदलगे, आरती सदाफुले - नेकी.
यावेळी मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य संदीप पाटील, नियामक मंडळाचे सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, सांगली शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर ताम्हनकर, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे, स्पर्धा समितीचे अध्यक्ष सचिन पारेख उपस्थित होते.
सांस्कृतिक चळवळीत सहभाग म्हणून सुरू केलेल्या पीएनजी महाकरंडक स्पर्धेला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त होत असल्याबद्दल गाडगीळ यांनी आनंद व्यक्त केला. नरेंद्र आमले आणि मधुवंती हसबनीस यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी केले. स्पर्धा समितीचे अध्यक्ष सचिन पारेख यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. कार्यवाह विशाल कुलकर्णी आणि शशांक लिमये यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले. स्पर्धेस कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.