जुळ्या मुलीच का झाल्या, म्हणून विवाहितेला जीवे मारण्याची धमकी File photos
सांगली

जुळ्या मुलीच का झाल्या, म्हणून विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

Woman harassed for daughters : मुलींपासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : ‘तुला मूलबाळ का होत नाही आणि सरोगसी केल्यानंतर जुळ्या मुलीच का झाल्या’ या कारणावरून शारीरिक, मानसिक त्रास देत मारहाण करून पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद विवाहिता नीता राजेश पवार (वय 38, सध्या रा. शेटफळे, ता. आटपाडी, मूळ रा. बांबवडे, ता. पलूस) दिली आहे. राजेश माणिक पवार (रा. बांबवडे, ता. पलूस) असे संशयिताचे नाव आहे.

माहेरहून सात - आठ लाख घेऊन यावेत म्हणून पतीने जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, 2012 साली लग्न झाल्यानंतर 16 एप्रिल 2025 या कालावधीत पतीने मला त्रास दिला. मला मूलबाळ होत नाही म्हणून त्रास दिला जायचा. त्यामुळे सरोगसी करण्यात आली आणि जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर रुग्णालय खर्चासाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी आणि कारखान्याच्या कामासाठी माहेरहून सात ते आठ लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास दिला.

शेतातील काम लावून मुलींपासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आले. स्वयंपाक येत नाही आणि अन्य किरकोळ कारणांवरून मारहाण करून माहेरी शेटफळे येथे आणून सोडले. परत यायचे नाही आणि आलीस तर पैसे घेऊन ये अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली शारीरिक छळ केला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गावडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT