Murder Case File Photo
सांगली

Jat murder case: लग्नासाठी तगादा लावल्याने महिलेचा खून उघडकीस; संशयित अटकेत

मृत महिला कडेगाव तालुक्यातील वांगी येथील

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : लग्नसाठी तगादा लावल्याने प्रियकराकडून अमृतवाडी येथे सविता विजय घोडके (वय 32, रा. वांगी, ता. कडेगाव) या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिध्दाप्पा मदाप्पा आमागोडरू (वय 37, रा. हळदोडवरु गल्ली, उमदी, ता. जत) याला पोलिसांनी अटक केली.

प्रकरणाचा जत पोलिसांनी छडा लावला असून, याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. दि. 30 मार्चरोजी अमृतवाडी येथील एका पेट्रोलपंपाजवळील शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर जत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना डीबी पथक व गोपनीय विभागातील पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवली. सिध्दाप्पा मदाप्पा आमागोडरु याच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मृत सविता आणि सिध्दाप्पा यांच्यात जुनी ओळख असल्याचे समोर आले. सविता ही सिध्दाप्पाकडे लग्नासाठी सतत तगादा लावत होती. तसेच लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी देत होती. यामुळे सिध्दाप्पा त्रस्त होता.

दरम्यान, 28 मार्चरोजी सविता जत येथे आली होती. त्याच दिवशी सिध्दप्पाने तिला दुचाकीवरून जत-उमदी मार्गावरील अमृतवाडी परिसरातील ओसाड शेतात नेले. तिथे ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात दगड घालला. याबाबतची कबुली सिध्दाप्पा याने पोलिसांसमोर दिली आहे. त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT