बेंद्री रस्त्यावर घडला जादूटोण्याचा प्रकार Pudhari File Photo
सांगली

Sangli News : बेंद्री रस्त्यावर घडला जादूटोण्याचा प्रकार

वाढत्या प्रकाराने चिंतेचे, संशयाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव ते बेंद्री रस्त्यावर भानामतीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तालुक्यात अशा घटना वाढू लागल्याने चिंतेचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या प्रकाराला आळा घालण्याची मागणी होत आहे. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याबाबत नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन अंनिसचे भास्कर सदाकळे यांनी केले आहे.

तासगाव - बेंद्री रस्त्यावर बेंद्री गावाच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी रस्त्याकडेला एका टोपलीत तीन नारळ, दोन काळ्या बाहुल्या, पाच लिंबू, सुया, बिब्बे, हळद-कुंकू असे साहित्य आढळून आले. नारळ व बाहुल्या काळ्या दोर्‍याने एकमेकात गुंफल्या आहेत, अशा अवस्थेत या ठिकाणी पूजा केली असल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती सदाकळे यांना देण्यात आली. सदाकळे यांनी टोपलीतील साहित्याची पाहणी केली असता, हा प्रकार जादूटोण्याचा असल्याचे त्यांना दिसून आले. कोणीही अशा प्रकाराने घाबरून जाऊ नये, असे आवाहन सदाकळे यांनी केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

सध्या तालुक्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातच येळावी जिल्हा परिषद गटात मोठी चुरस दिसत आहे. बेंद्रीसह यापूर्वी म्हणजे आठवड्यात वासुंबे व तुरची येथे अशा घटना घडल्या आहेत. वासुंबे येथील भानामतीचा प्रकार हा व्यावसायिक स्पर्धेतून झाला असल्याचे समोर आले होते. ही तिन्ही गावे येळावी जिल्हा परिषद गटात येत असल्याने या घटनांबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT