वाळवा : गौरव नायकवडी यांनी वाळवा-बावची गटातील जी विकासाची कामे सुचवली, ती सर्व मंजूर केली असून ती लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी वाळवा येथे बोलताना व्यक्त केला.
वाळवा गावातील अहिरगल्ली रस्ता डांबरीकरण करणे, घोरपडे घर ते थोरात वस्ती रस्ता सुधारणा, अंगणवाडीचे बांधकाम करणे, जिल्हा परिषद शाळा नं. 1 ची दुरुस्ती करणे, राजू सावंत, चांदोली वसाहतीशेजारी लाईट पोल बदलणे, माळभाग नायकवडी गल्ली येथील एल.टी, लाईन शिफ्ट करणे, रामोशी घर ते कोरे घर डी.पी. बसवणे, महात्मा फुले नगर वसाहत रस्ता काँक्रिटीकरण करणे, इजिमा 39 गौडवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड-वाळवा रस्ता सुधारणा करणे, मानसिंग नायकवडी शेत ते वत्सला नायकवडी पाणंद रस्ता करणे आदी रस्त्यांच्या कामाचे पूजन करण्यात आले. मातोश्री पाणंद रस्ते व जिल्हा नियोजनमधून रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती गौरव नायकवडी यांनी दिली.
वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे, अहिरवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव, भगवान पाटील, पोपट अहिर, राजाराम शिंदे, संजय अहिर, राजेंद्र मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.